जळगाव । हॉकर्सवरील दडपशाही आणि महापालिकेच्या वतीने सुरु असलेली कार्यवाही त्वरित थांबवा या साठी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन यांच्या कडून महापालिकेसमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनेचे विजय पवार,शेख युसुफ शेख रुस्तम, कॉ रियाज बागवान, मेरोसिंग राजपूत, उमा शंकर यादव,विनोद केळकर ,भूरालाल प्रजापत ,धनराज पाटील , मुकेश चौधरी ,हार्दिक सपकाळे ,राहुल सपकाळे,प्रेम परदेशी सह हॉकर्स सहभागी झाले होते.
बेरोजगारीचे पडसाद
मागील अनेक महिन्या पासून हॉकर्स ,फेरीवाले, फळ विक्रेते खाद्य पदार्थ विक्रेते असे अनेक रोजगार शहरात सुरु असताना अतिक्रम विभागा कडून कार्यवाही करण्यात येत आहे. महापालिकेला जागा वापरण्या संदर्भात कर मिळत असताना अशा प्रकारची कार्यवाही का करण्यात येत असल्याचा सवाल सिटू सह कामगार संघटनानी महानगर पालिकेाला निवेदनाच्या माध्यमातून केला आहे. यामुळे संपूर्ण शहरात बेरोजगारी चे सावट असताना महापालिकेच्या दडपशाही कारभार अतिक्रम हटाव मोहिमेने शहरात बेरोजगारीचे पडसाद उमटू शकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कार्यवाहीत दुजाभाव
महापालिकेच्या वतीने सुरु असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमे मध्ये दुजाभाव होत आहे, जे लोक हप्ते देत आहेत त्यांच्यावर कार्यवाही होतच नाही. या बाबत चौकशी करा तसेच राष्ट्रीय फेरीवाला धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांची अमलबजावणी झाली पाहिजे. गांधी उद्यान ,अजिंठा चौफुली येथे व्यवसाय करणारे हॉकर्स चा रहदारीस कोणताही अडथळा नसताना त्यांच्यावर देखील कार्यवाही होत आहे. या मुळे हॉकर्सवर कार्यवाही थांबविण्याची मागणी करण्यात आली आहे.अतिक्रमणाच्या नावावर कार्यवाही करण्यात येत आहे. असा आरोप सिटू संघटनेने केला आहे. ही कार्यवाही थांबविण्याची मागणी होत आहे.
महापालिकेचे कार्यवाही सत्र
जळगाव शहर महापालिकेची अतिक्रमण विरोधी मोहीम न्यायालयाच्या आदेशाने सुरु असल्याने आता हि न्यायालयीन प्रक्रिया झाली आहे. शहरात रस्त्याच्या आड येणारे अतिक्रमण काढण्याचे आदेश न्यायालयाचे आहे. महापालिकेचे शहरात एका मागून एक कार्यवाही सत्र सुरु असून बड्या दिग्गजांवरदेखील कारवाईचे संकेत असल्याचे महापालिका सुत्रांनी दिले आहे