तिघींविरोधात गुन्हा
हे देखील वाचा
सांगवी : किरकोळ कारणावरुन तीन महिलांनी एका महिलेला हॉकी स्टीकने मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. 17) पिंपळे सौदागर येथे घडली. याप्रकरणी तीन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शितल संदिप टाक (वय 32, रा. पिंपरी) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पिंकी रुपेश बोत (रा. भाटनगर), अनिता राकेश बेद, दिक्षा राकेश बेग (रा. वानवडी, पुणे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आरोपी पिंकी ही फिर्यादी शितल यांच्या मामाची मुलगी आहे. शितल यांनी आरोपी पिंकी यांच्या पतीला उसने पैसे दिले होते. ते पैसे मागण्यासाठी शितल आरोपी पिंकी यांच्या घरी आल्या होत्या. त्यावेळी पिंकी यांच्या घरात अन्य दोन आरोपी महिला अनिता आणि दीक्षा होत्या. शितल यांनी पिंकी यांना पैसे मागताच तिघी आरोपींनी मिळून शितल यांना शिवीगाळ केली. तसेच हॉकी स्टिकने मारहाण केली. यामध्ये शितल जखमी झाल्या. याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सांगवी पोलीस करीत आहेत.