लुसाने । आंतरराष्ट्रीय हॉकी संघाचा महत्वकांशी उपक्रम असलेल्या हॉकी प्रो लीग स्पर्धेतून भारताने माघार घेतली आहे. हॉकी इंडियाच्या या निर्णयाला आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने दुजोरा दिला असून, भारताने लीगमधील सहभाग रद्द केल्यामुळे महासंघाने खेद व्यक्त केला आहे. महिला आणि पुरूषांमधील जागतिक क्रमवारीतले आघाडीचे नऊ संघ या लीगमध्ये खेळणार होते. या लीगमध्ये पहिल्या चार क्रमांकांमध्ये येणार्या संघाना टोकियो ऑलिम्पिकसाठी थेट प्रवेश मिळणार होता. लीगमधून माघार घेण्याच्या हॉकी इींडयाच्या निर्णयामुळे भारताच्या ऑलिम्पिकमध्ये खेळण्याच्या प्रयत्नांमध्ये अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. ही लीग टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रतेचा निकष असलेली स्पर्धा होती. ही लीग स्पर्धा पुढील वर्षी जानेवारी महिन्यापासून जुलै महिन्यापर्यंत रंगणार आहे. स्पर्धेतील संघ एकमेकांशी घरी आणि बाहेर असे दोन सामने खेळणार आहेत.
पोलीस चौकशीचे निमित्त
लीगमधून भारतीय बाहेर पडण्याची अनेक कारणे सांगितली जात आहे. त्यात लंडनमध्ये झालेल्या हॉकी लीगमधील उपांत्य फेरीच्या लढतींदरम्यान भारतीय कर्णधार सरदार सिंगची एक वर्ष जुने असलेल्या विनयभंगाच्या प्रकरणी चौकशी करण्यात आली होती. लंडन पोलिसांनी केलेल्या या चौकशीबाबत हॉकी इंडियाने नाराजी व्यक्त केली होती. याशिवाय
लंडनमधील स्पर्धेदरम्यान मॅचफिक्सींग झाल्याचा आरोप करत हॉकी इंडियाने जागतिक संघटनेला पत्र लिहून चिंता व्यक्त केली होती.
भारताऐवजी दुसरा देश आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या
प्रो लीगमधून बाहेर पडण्याच्या हॉकी इंडियाच्या निर्णयाचा आम्हाला खेद वाटतो, लीगमध्ये खेळण्यासाठी अनेक देशांचे अर्ज आले होते. भारताच्या माघारीमुळे त्यापैकी एका देशाला लीगमध्ये खेळण्याची संधी मिळेल. असे आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र बात्रा यांनी सांगितले.