हॉटेलमधून 70 हजारांची रोकड लांबवली : वेटरला पोलिसांनी घातल्या बेड्या

जळगाव : तालुक्यातील कानळदा गावातील हॉटेल उत्कर्षमधून 70 हजारांच्या रोकडसह डीव्हीआर चोरणार्‍या वेटलर पोलिसांनी अटक केली आहे. सागर किशोर ठाकरे (21, कानळदा, जळगाव) असे अटकेतील संशयीत आरोपीचे नाव आहे.

तालुका पोलिसात दाखल होता गुन्हा
जळगाव तालुक्यातील नांद्रा बुद्रूक विजय भिकनराव सोनवणे यांची कानळदा गावात उत्कर्ष नावाने हॉटेल आहे. या हॉटेलातील वेटर सागर ठाकरे याने हॉटेलच्या गल्ल्यातून 70 हजारांची रोकड तसेच सीसीटीव्ही कॅमेर्‍याचा डीव्हीआर बॉक्स लांबवला होता. ही घटना गुरुवार, 28 एप्रिल रोजी समोर आल्यानंतर हॉटेल मालक विजय सोनवणे यांनी तालुका पोलिसात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. जळगाव तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यावर संशयीत वेटर सागर ठाकरे यास अटक केली आहे. पुढील तपास निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल अनिल फेगडे हे करीत आहेत.