The death of a foreign teacher working in a hotel in Bhusawal भुसावळ : साकेगाव महामार्गावरील खालसा हॉटेलमध्ये काम करणार्या परप्रांतीय आचार्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मंगळवारी मृत्यू झाला. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. हेमंतकुमार कमलाप्रसाद सिंह (54, गायत्री मंदिराजवळ, वॉर्ड क्रमांक 24, ईटारसी, जि.होशंगाबाद) असे मयताचे नाव आहे.
हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
साकेगाव महामार्गावरील हॉटेल खालसा येथे हेमंतकुमार सिंह हे आचारी म्हणून गेल्या काही वर्षांपासून कामाला होते शिवाय आजाराने ते त्रस्तही होते. मंगळवारी पहाटे त्यांच्या छातीत त्रास होवू लागल्यानंतर त्यांना तातडीने भुसावळातील ट्रामा केअर सेंटरमध्ये हलवण्यात आले मात्र हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू ओढवला. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस हवालदार सुनील भोई करीत आहेत.