हॉटेल ‘केवल कूक’जवळ कारने घेतला पेट

0

जळगाव । अग्रवाल हॉस्पीटलसमोरच असलेल्या हॉटेल केवल कूकच्या बाजुला मंगळवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास कारने अचानक पेट घेतला. कारला आग लागल्याचे कळताच काही नागरीकांनी महापालिकेच्या अग्निशमन विभागाला त्याची माहिती दिल्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळी येऊन काही मिनिटात आग आटोक्यात आणली. दरम्यान, शॉर्ट सर्कीटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

शॉर्ट सर्कीटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज
तांबापुरा येथील अमिनोद्दीन समशोद्दीन शेख (वय-32) हे त्यांची कार (क्र. एमएच-19-एइ-1053) घेऊन मंगळवारी दुपारी हॉटेल केवल कूकमध्ये कामासाठी आले होते. त्यांनी त्यांची कार हॉटेल केवल कूकच्या बाजुच्या इमारतीच्या कंपाऊंडमध्ये लावली. त्यानंतर ते कामासाठी निघून गेले. काही वेळानंतर त्यांना कारला आग लागल्याचे समजले. काही नागरीकांनी अग्निशमन विभागाला फोन करून माहिती दिली. त्यानंतर दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास महापालिकेच्या अग्निशमन विभागाचा बंद त्या ठिकाणी आला. अग्निशमन विभागाच्या कर्मचार्‍यांनी काही मिनिटात आगीवर नियंत्रण मिळविले. शार्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन विभागाच्या कर्मचार्‍यांनी वर्तविला आहे.