जळगाव : राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल गौरवसमोर भरधाव लक्झरीने महामंडळाच्या बसला जोरदार धडक दिली. या अपघातात यात बसचालक किरकोळ जखमी झाला. या प्रकरणी लक्झरी चालकाविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
अपघातात बस चालक जखमी
जळगाव आगाराची जळगाव-भुसावळ बस (एम.एच.13 सी.यू.7496) राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल गौरवजवळून जात असताना पाठीमागून आलेल्या भरधाव लक्झरी (क्रमांक जी.जे.5 झेड.7107) ने जोरदार धडक दिल्याने बस चालक अशोक कृष्णा पवार (पिंप्री, ता.धरणगाव) हे किरकोळ जखमी झाले. जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रथमोपचार घेतल्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिल्यानंतर गुरुवार, 9 जून रोजी सकाळी 9 वाजता लक्झरी चालक सत्यवान मच्छिंद्र सोनवणे (जयजवान सोसायटी, मोहाडी, ता.) विरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार विजय पाटील करीत आहे.