नंदुरबार। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक येथील भरारी पथकाने छडवेल कोर्डेच्या नवरंग हॉटेलवर छापा टाकून 65 लाख 30 हजार रुपये किंमतीचा मद्यसाठा जप्त करण्याची कारवाई केली आहे. एका खेडेगावात एवढ्यामोठ्या रक्कमेचा दारू साठा आढळून आल्याने गुजरात राज्यात दारू पुरवठा करणारी एक मोठी साखळी कार्यरत असण्याची शक्यता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने व्यक्त केली आहे. ही कारवाई छडवेल येथे झाली मात्र यातील संशयित आरोपी म्हणून शहादा तालुक्यातील अनकवाडे येथील मुकेश अरुण चौधरी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.