हॉटेल, पंक्चर दुकानाला आग

0

नवापूर । शहरातील नॅशनल हायवे क्र 6 जवळील नवापूर सर्वे पेट्रोल पंपाजवळील हॉटेल शिवम व इंडीया टायर पंचर फिटीग या दोन दुकानांना रात्री 1 वाजता शॉर्टशर्कीटमुळे भिषण आग लागली. यात संपुर्ण दुकानजळुन खाक झाले असून यात 2 फ्रिज,2 पंखे, गॅसशेगड्या, 3 काँऊंटर, 3 मोठा टिवी, सी.सी कॅमेरे एक, टेबल खुर्ची, 3 प्लास्टीकचे ड्रम, सोड्याचा बाटल्या,60 पत्रे,लोखंडी अँगल 22, अशा वस्तु जळुन खाक झाले आहे. यात अंदाजे 1लाख 90 हजारांचे नुकसान झाले. तसेच टायर दुकांनाचे टाकी कँपरेसर, मोटार थीरीपेज,व जुने टायर 1000 बीसचे,पत्रे 30, हिटर मशिन 2, असे एकुण 1 लाख 70 हजार रुपयांचे अंदाजीत नुकसान झाले आहे. दोघ दुकांनमिळुन 3 लाख 60 हजारांचे नुकसान झाले आहे.

महामार्गांवरील वाहतूक ठप्प
रात्री 1 वाजता शिवसेना जिल्हाउपप्रमुख हसमुख पाटील व नगरसेविका अरुणा पाटील,युवा सेनेचे अध्यक्ष राहुल टिभे यांनी घटनास्थळी येऊन नवापूर नगरपालिकेला फोन केला व अग्रिशामक बंबला पाचरण केले. या नंतर रात्री 3 वाजेला आग आटोक्यात आली. सकाळी 9 वाजता तलाठी विनाकय गावीत व मिलिंद कुलकर्णी यांनी घटनेचा पंचनामा केला आहे. नवापूर शहरात महिन्यातील आगीची ही तिसरी घटना आहे. आगीचे प्रमाण वाढत असुन शाँट सर्कीट हे कारण याला जास्त असते. आगीमुळे महामार्गावर काही तास वाहने ठप्प झाली होती. रात्री शहरातील युवकांनी येऊन आग आटोक्यात यावी म्हणुन शर्तीचे प्रयत्न केले.

बंब आले उशिरा
रात्री 1 वाजता आग लागली होती. जवळपास एक तास नगर पालिकेचा अग्रिशामक बंब उशिरा आल्याने संपुर्ण दुकान जळुन खाक झाल्यांचे उपजिल्हाप्रमुख हंसमुख पाटील यांनी सांगितले. प्रशासना मार्फत योग्य ती भरपाई मिळावी अशी चर्चा केली . यावेळी दुकानाचे मालक अविनाश पिसे यांनी नुकसान भरपाईची मागणी केली. संबधीत अधिकार्‍यांनाही योग्य तो पंचनामा करून वरीष्ठांना प्रस्ताव सादर केला जाणार असल्याचे सांगीतले.

पेट्रोलपंपावरील कर्मचार्‍याचे धाडस
या दुकानाचे मालक अविनाश सुनिल पिसे व टायर दुकांचे मालक मोहमद मेनोदीन अन्सारी यांचा मालकांची ती दुकाने आहेत. रात्री 1:30 वाजता या दुकानाचे मालक अविनाश पिंसे यांना विज मंडळांचे कर्मचारी यांनी फोन केला होता. जवळच असलेले पेट्रोल पंपावर काम करणारे कर्मचारी नरेश पाटील यांनी आपले धाडस दाखवुन दोन सिलेंडर आगीतुन बाहेर काढले. नाही तर फार मोठा अनर्थ झाला असता. यात आगीतुन गँस सिंलेडर काढतांना नरेश पाटील यांचे दोघेे हात जळाले.