जळगाव। शिरसोली रस्त्यावरील हॉटमिक्सींग प्लँटमधील डांबराला गुरूवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. घटनास्थळी दोन अग्निशमन बंब पाचाराण करण्यात आल्यानंतर काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. बांधकाम ठेकेदार एल.एच.पाटील यांचे शिरसोली रस्त्यावर हॉटमिक्सी प्लँट आहे. या ठिकाणी खडी आणि डांबर मिक्सींगचे काम चालते. गुरूवारी सकाळी मात्र, हॉटमिक्स प्लँटमधील डांबराला अचानक आग लागली.
पोलिसात आगीची नोंद
आग लागल्याचे कर्मचार्यांच्या लक्षात येताच त्यांनी लागलीच अग्निशमन दलाला व एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती दिली. काही मिनिटातच जैन कंपनीचे व महानागरपालिकेचे पाण्याचे बंब घटनास्थळी पाचारण होवून त्यांनी पाण्याचा मारा केला. यावेळी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे बाळकृष्ण पाटील, सचिन मुंडे तर पोलिस पाटील शरद पाटील, श्रीकृष्ण पाटील देखील घटनास्थळी उपस्थित होते. काही वेळानंतर अग्निशमन दलाला आग विझविण्यात यश आले. दरम्यान, या आगीत किरकोळ नुकसान झाले आहे. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.