वाकड : मोटार ओव्हरटेक करत असताना दुचाकीस्वारांनी जोरजोरात हॉर्न वाजवले. याबाबत मोटारचालकाने विचारणा केली असता दुचाकीवरील चौघांनी मिळून त्याला मारहाण केली. हा प्रकार बावधन मधील सेहगल शोरुमच्या समोर घडला. याबाबत हरिदास गायकवाड (वय 28, रा. माताळवाडी, मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरिदास गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास बावधन मधील सेहगल शोरुमच्या समोरुन जात होते. रस्त्याने जात असलेल्या दुचकीस्वारांना ओव्हरटेक करुन ते पुढे गेले. पुढे जात असताना दुचाकीस्वारांनी जोरजोरात हॉर्न वाजवले. याबाबत हरिदास यांनी दुचाकीस्वाराना विचारले. यावरुन दुचाकीस्वारांनी हरिदास यांना मारहाण केली. तसेच त्यांच्या खिशातील 1 हजार 300 रुपये जबरदस्तीने काढून घेतले. यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.