हॉलंडची बर्टन्स विजेती

0

न्युरेमबर्ग । हॉलंडच्या किकी बर्टन्सने न्युरेमबर्ग महिलांच्या टेनिस स्पर्धेत सलग दुसऱयांदा अजिंक्यपद पटकाविले. शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यात विद्यमान विजेती बर्टन्सने झेकप्रजासत्ताकच्या क्रेजीकोव्हाचा 6-2, 6-1 अशा सेटस्मध्ये पराभव केला. या सामन्यात 25 वर्षीय बर्टन्सने सात बिनतोड सर्व्हिसची नोंद केली. गेल्यावर्षी बर्टन्सने ही स्पर्धा जिंकली होती.