लॉस एंजेल्स:हॉलिवुड अभिनेता डॅनियल क्रेगच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लग्नाच्या सात वर्षानंतर डॅनियलच्या घरी एक नन्ही परी अवतरली आहे. डॅनियलची पत्नी रेचल वाइस हिनं मुलीला जन्म दिला असून चिमुकलीच्या आगमनानं दोघेही फार आनंदात आहेत.
काही महिन्यांपूर्वी ‘न्यू यॉर्क टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत रेचलनं गरोदर असल्याचं सांगितलं होतं. ‘मी आणि डॅनियल बाळाच्या स्वागतासाठी खूपचं उत्सुक असून त्याच्या येण्याची वाट पाहत आहोत’ असंही रेचल म्हणाली होती.