हॉलीबॉल स्पर्धेत नाईक विद्यालयाचे यश

0

शहादा । येथील वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालयाचा 17 वर्षे वयोगटातील व्हॉलीबॉल संघाने शेठ व्ही.के. शहा विद्यालयाचा मैदानावर झालेल्या तालुकास्तरीय स्पर्धेत विजय मिळविल्याने अभिनंदन केले जात आहे. विजयी संघाची नंदुरबार येथे होणार्‍या जिल्हास्तरीय पातळीवर निवड झाली आहे.

वसंतराव नाईक विद्यालयाने अंतीम सामन्यात शहादा येथील चावरा इंग्लिशस्कुलचा संघाला पराभुत करुन विजेतेपद मिळविले. या यशस्वी खेळाडूचे संस्थेचे विभागीय सचिव प्रा.संजय जाधव, सोनामाई सस्थेचा सचिव वर्षा जाधव समनवयक संजय राजपुत ,उपप्राचार्य रघुवंशी पर्यवेक्षक सुनिल सोमवंशी यांनी अभिनंदन केले तर खेळाडूना क्रिडाशिक्षक प्रा वाय.एस.राठोड, एच.एस. तेलगोट, आर.बी.मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. याच विद्यालयातील उच्च माध्यमिक गटात बुद्धिबळ स्पर्धेत देखील विजेते पद मिळविले आहे.