‘होऊन जावू द्या’, फडणवीसांसोबत चर्चेसाठी मी तयार: खडसेंचे प्रत्युत्तर

0

जळगाव: भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहे. काल गुरुवारी १० रोजी त्यांच्यावरील पुस्तक प्रकाशनावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट आरोप केले. माझ्या विरोधात कटकारस्थान रचण्यामागे फडणवीस यांचा हात असल्याचे आरोप खडसे यांनी केले होते. दरम्यान आज शुक्रवारी फडणवीस यांनी ‘खडसे हे आमचे ज्येष्ठ नेते असून त्यांच्याबद्दल आदर आहे, ते आमच्या परिवारातील असून त्यांची नाराजी चर्चा करून दूर करू’ असे सांगितले. दरम्यान आता यावर खडसे यांनी प्रत्युत्तर दिले असून ‘गेल्या चार वर्षापासून मी फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यासाठी तयार आहे, त्यांनी यावे चर्चेसाठी’ असे थेट आव्हान खडसे यांनी दिले आहे.

एमआयडीसी प्रकरणात माझा काहीही संबंध नाही, माझ्या जावयाने आणे पत्नीने जमीन खरेदी केली, ती पूर्णपणे कायदेशीर आहे असे खडसे यांनी सांगितल.