फैजपूर। बहिणाबाई शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कुसुमताई मधुकरराव चौधरी माध्यमिक विद्यालय येथे 13 रोजी जळगाव पिपल्स बँकेतर्फे गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी विद्यालयाचे चेअरमन पी.के. चौधरी होते. प्रमुख पाहुणे दादा नेवे, रामेश्वर जाखेटे, संस्थेचे सचिव डॉ. उमेश चौधरी, सहसचिव प्रा. विलास बोरोले, व्हो. चेअरमन मोहन महाजन, संचालक अशोक पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
प्रास्ताविक पर्यवेक्षक बी.एम. बोंडे यांनी केले. सुत्रसंचालन प्रिती चौधरी तर आभार अनिल उबाळे यांनी मानले. कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.