जळगाव- मुद्दही लाख बुरा चाहे क्या होता है, वही होता है जो मंजूरे खूदा होता है या उक्तीचा गुरुवारी जिल्हा रुग्णालयात सर्वांनाच प्रत्यय आला. कुंभारखेडा येथून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येत असलेल्या गरोदर महिलेला घेवून येणार्या रुग्णवाहिकेतच विना डॉक्टर महिलेची प्रसूती होवून मुलगी जन्माला आल्याची घटना घडली. सुदैवाने यावेळी रुग्णवाहिका रुग्णालयात पोहचल्याने बाळासह आईला वेळीच उपचारासाठी दाखल करण्यात आले. बाळ व आई दोघे सुखरुप असल्याची माहिती मिळाली.