संबंध असणे गैर नाही: पालकमंत्री ना. पाटील
जळगाव: भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेच्या अवसायक काळातील घोटाळ्याप्रकरणी पोलीसांना हवा असलेला सुनील झंवर हा माझ्या गावचा आहे, मित्र आहे आणि राहील, संबंध काही वरून ठरत नसतात. संबंध असणे यात काही गैर नसल्याचे वक्तव्य पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलतांना केले.
अवसायक काळात झालेल्या घोटाळ्याप्रकरणी सुनील झंवर हा पोलीसांना अद्यापपर्यंत सापडलेला नाही. यासंदर्भात राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनीही प्रश्न उपस्थित केला आहे. तर अत्यंत निकटचे संबंध असलेल्या भाजपाच्या आमदार गिरीश महाजन यांनीही झंवर याचे पालकमंत्र्यांसह जिल्ह्यातील सर्व नेत्यांशी संबंध असल्याचा गौप्यस्फोट केला होता.
पालकमंत्र्यांचे विधान अनेक प्रश्न उपस्थित करणारे
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, सुनील झंवर हा माझ्या गावचा आहे. गावाचा मित्र काय नातेवाईकासारखाच असतो. कुणाशी संबंध ठेवणे यात काही गैर नाही. कुणाच्या काळासुत्रीत कुणाला वाटत असेल तर खुली मैदान आहे त्यांनी बघावं असा टोलाही आमदार महाजन यांना लगावला. भाईचंद हिराचंद रायसोनी या पतसंस्थेच्या अवसायक काळातील गैरव्यवहाराची सध्या चौकशी सुरू आहे. या प्रकरणात अनेक
मालमत्तांची कवडीमोल भावात खरेदी विक्री करणारा सुनील झंवर हा पोलिसांना सापडत नाही. अशात पालकमंत्र्यांनी केलेले हे विधान निश्चीतच अनेक प्रश्न उपस्थित करणारे असल्याची चर्चा आहे.