होळनांथे। येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामार्फत ‘डॉक्टर आपल्या गावी’ हा उपक्रम राबविण्यात येत असून सदर उपक्रमांतर्गत हिसाळे गावात 09 एएमसी माता 11 पीएनसी माता यांच्यासह 136 रुग्णांची तपासणी करण्यात आली. यात रुग्णांची तपासणी व औषधोपचार करण्यात आला. हिसाळे येथे आयोजित सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरपूर पंचायत समितीचे उपसभापती संजय पाटील हे होते तर माजी सरपंच संतोष पावरा, उपसरपंच विकास पाटील, ग्रा.पं.सदस्य जितेंद्र करनकाळ, खरेदी विक्री संघाचे संचालक संतोष परदेशी यांची उपस्थिती होती.
शिबीरात यांचा सहभाग
या उपक्रमांतर्गत रुग्णांची आपल्या गावातच तपासणी व योग्य तो औषध पुरवठा करण्यात येणार असून होळनांथे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गावात डॉक्टर आपल्या गावी उपक्रम राबविण्यात येत असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रकाश पवार यांनी सांगितले. कार्यक्रमास वैद्यकीय अधिकारी डॉ.पी.बी.पवार, डॉ.एम.आर.निकम, औषध निर्माण अधिकारी आर.जे.पावरा, आरोग्य सहाय्यक पी.व्ही.पवार, श्रीमती पी.आर.आढाव, पी.जे.सोनवणे, व्ही.बी.देशमुख, आरोग्य सेविका श्रीमती एस.डी.चव्हाण, श्रीमती एम.व्ही.हिरे, योगेश कोळी यांचे सहकार्य लाभले. आरोग्य शिबिराला परीसरातील नागरीकांसह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.