होळनांथे येथे पर्यावरण संवर्धन चित्रकला स्पर्धेंचे आयोजन

0

होळनांथे। येथील राजमुद्रा प्रतिष्ठानतर्फे परिसरातील सार्वजनिक जागेत शंभरांवर झाडे लावण्यात येणार असून या झाडांना वर्षभर पाणी देण्याचे नियोजनही संस्थेतर्फे करण्यात येणार असल्याचे संस्थेतर्फे कळविण्यात आले आहे. सार्वजनिक जागेत वृक्षलागवड प्रतिष्ठाननतर्फे करण्यात येणार आहे.

यात होळनाथे प्राथमिक आरोग्य केंद्र अंजदे, आरोग्य उपकेंद्र, शाळा परिसर, गणेश नगर, बैंसाणे नगर, अंजदे बु। नवीन घरकुल वस्ती आदीं ठिकाणच्या सार्वजनिक जागेत वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. लहानपणांपासून मुलांमध्ये पर्यावरणाची आवड निर्माण व्हावी यासाठी लहान मुलांसाठी पर्यावरणाचे महत्त्व कळावे याउद्देशाने पर्यावरणावर चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार आहे. यात वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन, प्राणी, पक्षी आदी विषयांवर स्पर्धा घेण्यात येईल. यातून उत्कृष्ट चित्रांना पारितोषिक देण्यात येणार असून जास्तीत जास्त स्पर्धेकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश पाटील यांनी केले आहे.