होळनांथे येथे पुर्व वैमनस्यातून दोन गटात हाणामारी

0

शिरपूर। तालुक्यातील होळनांथे गावात लहान मुलांच्या किरकोळ भांडणातून वाद निर्माण झाल्याने दोन गटात तुफान मारहाण झाल्याची घटना शनिवार 25 रोजी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रविवारी थाळनेर पोलीसांत परस्पर विरूद्ध तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परंतू या मारहाणीमागे गावात खुलेआम फोफावणारे ऐवध धंद्यांची कारणे असल्याची गावात जोरदार चर्चा सुरू आहे. या हाणामारीत कुर्‍हाड, तलवार, लाठ्या काठ्यांचा याचा वापर करण्यात आला आहे.

हॉटेल मधील टेबल, खुर्च्यांची तोडफोड
शनिवार 25 रोजी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास होळनांथे गावाजवळील नवीन बसस्थानकाजवळ सार्वजनीक जागी फिर्यादी रमेश बन्सीलाल कोळी यांना लहान मुलांच्या किरकोळ भांडणाच्या कारणांवरून संशयित आरोपी प्रदिप नागो राजपूत,जगदिश गोवर्धन राजपूत, राकेश राजपूत,राज राजेंद्र राजपूत, सनी युवराज राजपूत,राहुल गोवर्धन राजपूत,राहुल युवराज राजपूत,भाया राजपूत,तुषार बारकू सोनार, भुषण रजेसिंग राजपूत सर्व रा.होळनांथे यांनी लाठ्या काठ्या,तलवार,कुर्‍हाडीने मारहाण करून जिवेठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी संशयिताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर हितेंद्र राजेंद्रसिंग राजपूत यांनी पोलीसांना दिलेल्या तक्रारीवरून रमेश बन्सीलाल कोळी,आकाश कोळी,राकेश कोळी,गणेश कोळी आदिंनी त्याच दिवशी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास हॉटेल प्रशांतमध्ये येवून मालकास शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. हॉटेल मधील टेबल,खुर्च्यांची तोडफोड केली. त्यानूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसर्‍या गुन्ह्यात फिर्यादी कोमलसिंग राजपूत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पिंटू आत्माराम कोळी,रमेश बन्सीलाल कोळी,राकेश कोळी,आकाश कोळी,कैलास कोळी,प्रकाश कोळी,गणेश कोळी,प्रकाश दयाराम कोळी,सुरज कोळी यांनी बसस्थानकाजवळ कारण नसतांना फिर्यादीस मारहाण केल्याने गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे.