होळनांथे । ये थील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत खाते असलेल्या अजंदे बु येथील एका महिलेच्या खात्यामधून परस्पर 43 हजार रूपयाची खरेदी करून फसवूणक केल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान याप्रकरणी महिलेने थाळनेर पोलीसात तक्रार देवूनही तब्बल सतरा दिवस उलटले असून अद्याप गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली नाही. अंजदे गावातील रत्ना संतोष शिंदे या आशा कार्यकर्त्या म्हणून काम करतात. त्यांचे होळनांथे येथील स्टेट बँकेत खाते आहे. दरम्यान दि. 6 मार्च रोजी त्यांना एका व्यक्तीचा बँक मॅनेजर असल्याचा फोन आला. मी स्टेट बँकेतून मॅनजर बोलतोय तुमच्या खात्यासंबधी बॅकेला तुमचा आधार नंबरची आवश्यकता आहे. असे सांगून आधार नंबरची मागणी केली. रत्ना शिंदे यांनी भोळेपणात काहीही चौकशी न करता आधार नंबर देवून टाकला. दरम्यान काही तासाचत त्यांच्या खात्यामधून दहा हजार तीन वेळा, पाच हजार दोन वेळा तर दि.9 मार्च रोजी तीन हजार तीनशे रूपयाची खरेदी करण्यात आल्याचे बॅकेतील खात्याच्या स्टेटमेंट वरून त्यांना लक्षात आले.
तो फोन नंबर अजून सुरूच
ज्या फोन नंबर वरून रत्ना शिंदे यांना बँक मॅनेजर नावाचा फोन आला होता. तो फोन अजूनही सुरू आहे. त्या नंबरवर फोन केल्यास मी बँक मॅनेजर बोलत असल्याचा सांगीतले जाते. व फोन कट केला जात असल्याची खात्रीलायक माहिती आहे. तो फोन नंबर सुरू असल्यामुळे पोलीसांना चोरट्यांचा शोध लावणे सहज शक्य होणार आहे. परंतू पोलीसांच्या हलगर्जीपणामुळे चोरट्यांना अभय मिळेल. अशी चर्चा परिसरात सुरू आहे. तरी या सायबर क्राईममधील मोठे गुन्हेगारांचे जाळे पोलीसांच्या हाती लागणार असून पोलीसांनी मात्र सक्रीय होणे गरजेचे आहे.
आपली फसवणूक झाल्याचे समजताच रत्ना शिंदे यांनी थाळनेर पोलीस स्टेशन गाठले. पोलीसांना घडलेला प्रकार सांगून तक्रार दिली. मात्र थाळनेर पोलीसांनी सतरा दिवस उलटूनदेखील अद्याप याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला नाही. त्यामुळे परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात असून, पोलीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान संबधीतांवर गुन्हा दाखल करावा म्हणून फसवणुक झालेली महिला न्यायालयात दाद मागणार असल्याचे समजते.