होळनांथे । येथील क्षत्रीय महाराणा प्रतापसिंह मित्र मंडळ, होळनांथे, अजंदे बु ॥ यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रगौरव महाराणा प्रतापसिंह यांची 477 वी जयंती उत्साहात संपन्न झाली. नांथे पुनर्वसन येथील महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेचे पूजन करून मिरवणुकीस सुरवात करण्यात आली. तद्नंतर नविन बस स्टॅण्ड, अजंदे बु ॥ चौक, दाटुसिंग चौक, आदर्शनगर मार्गे निघालेल्या सवाद्य मिरवणुकीची सांगता जुने नांथे गावातील चौकात करण्यात आली. मिरवणुकीत अजंदे बु ॥ चौक, होळनांथे, भावेर व परिसरातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यांची होती उपस्थिती
शिरपूर कृषी बाजार समतीचे चेअरमन नरेंद्रसिंग सिसोदीया, होळनांथे विकास सोसायटीचे चेअरमन प्रकाशसिंह सिसोदीया, नांथे सरपंच महेंद्रसिंह राजपूत, शिरपूर सूतगिरणी संचालक भटेसिंग राजपूत, नांथे पो.पा.नरेंद्रसिंग जाधव, तंटामुक्त अध्यक्ष भटू पहेलवान, लोकमत प्रतिनिधी विजयसिंग राजपूत, भटेसिंग राजपूत, राजमुद्रा प्रतिष्ठानचे नरेंद्रसिंग राजपूत, नेपालसिंग राजपूत, वैदाणेचे प्रेमसिंग राजपूत, गोपाल राजपूत आदींची प्रमुख उपस्थिती होती.