तिथी : ‘देशपरत्वे फाल्गुन पौर्णिमेपासून पंचमीपर्यंतच्या 5-6 दिवसांत कुठे दोन दिवस, तर कुठे पाचही दिवस हा उत्सव साजरा केला जातो.
समानार्थी शब्द : ‘उत्तरेत याला होरी, दोलायात्रा, तर गोवा आणि महाराष्ट्र या राज्यांत शिमगा, होळी, हुताशनी महोत्सव अन् होलिकादहन आणि दक्षिणेत कामदहन अशा संज्ञा आहेत. बंगालमध्ये दौलायात्रा म्हणून होळीचा सण साजरा करतात. याला ‘वसंतोत्सव’ अथका ‘वसंतागमनोत्सव’ म्हणजे वसंत ऋतूचे आगमन साजरे करायचा उत्सव हे नावही देता येईल.’
इतिहास : ‘पूर्की ढुंढा किंवा ढौंढा नामक राक्षसी गावात शिरून लहान मुलांना पिडा द्यायची. ती रोग निर्माण करायची. तिला गावाबाहेर हाकलून देण्याकरिता लोकांनी पुष्कळ प्रयत्न केले, पण ती जाईना. शेवटी लोकांनी बीभत्स शिव्या-शाप देऊन आणि सर्वत्र अग्नी पेटवून तिला भिववले अन् पळवून लावले. त्यामुळे ती गावाबाहेर पळून गेली’ – भविष्यपुराण आ. ‘उत्तरेमध्ये होळीच्या आधी तीन दिवस अर्भक कृष्णाला पाळण्यात निजवतात आणि त्याचा उत्सव साजरा करतात. फाल्गुन पौर्णिमेला पूतना राक्षसीची प्रतिकृती करून ती रात्री पेटवतात.
एकदा भगवान शंकर तपाचरणात गढले होते. ते समाधी अवस्थेत असताना मदनाने त्यांच्या अंतःकरणात प्रवेश केला. तेव्हा ‘मला कोण चंचल करत आहे’, असे म्हणून शंकराने डोळे उघडले आणि मदनाला पाहताक्षणीच जाळून टाकले. दक्षिणेतील लोक कामदेव दहनाप्रीत्यर्थ हा उत्सव साजरा करतात. या दिवशी मदनाची प्रतिकृती करून तिचे दहन करतात. या मदनाला जिंकण्याची क्षमता होळीत आहे, म्हणून होळीचा उत्सव आहे.
फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी झालेल्या पृथ्वीवरील प्रथम महायज्ञाची स्मृती म्हणून प्रत्येक वर्षी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी सर्व भारतात ‘होली’ या नावाने यज्ञ होऊ लागले.’
‘या दिवशी झालेल्या पृथ्वीवरील प्रथम महायज्ञाच्या वेळी विष्णूला यज्ञकुंडातून बाहेर येण्यास ‘यर्व्य’ ऋषींनी प्रार्थना केली. भगवान विष्णूने धरतीवर पाय ठेवताक्षणीच स्वर्गातून त्याच्यावर पुष्पवृष्टी झाली.’ (स्वर्गातून झालेली ती प्रथम पुष्पवृष्टी होय. याच कारणास्तव उत्तर हिंदुस्थानात आजही फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होळीच्या ठिकाणी होळीचे प्रदीपन केल्यानंतर ओंजळीत फुले घेऊन ती हवेत उडवली जातात. त्या फुलांना ते ‘पलाश के फूल’, असे म्हणतात.)‘ओरिसामध्ये तेथील चैतन्यपंथी लोक कृष्णाच्या मूर्तीची पालखीतून मिरवणूक काढतात. प्रत्येक घरातील सुवासिनी त्या मूर्तीला अत्तर लावून गुलाल उधळतात. ऐपतीप्रमाणे दक्षिणा देतात. काही ठिकाणी लहान मुलांना कृष्णाची वेशभूषा करून त्याच्याभोवती टिपर्या खेळतात.’
आनंदाची उधळण करायला शिकवणारा सण होळी
विकारांची होळी करून जीवनात आनंदाची उधळण करायला शिकवणारा सण ‘होळी’ हा विकारांची होळी करण्याचा फाल्गुन मासातील सण आहे. ‘विकारांची जळमटे जाळून टाकून नवीन उत्साहाने सत्त्वगुणाकडे जाण्यासाठी आम्ही सिद्ध आहोत’, याचे जणू तो प्रतीकच आहे. राहिलेला सूक्ष्म-अहंकार हाही होळीतील अग्नीत नाहीसा होतो. तो शुद्ध सात्त्विक होतो. त्यानंतर रंगपंचमी आनंदाची उधळण करत येते. नाचत-गात एकत्र येऊन जीवनाचा आनंद लुटायचा. श्रीकृष्ण-राधा यांनी रंगपंचमीद्वारे सांगितले, ‘आनंदाची उधळण करा.’ – प.पू. परशराम पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
उत्सव साजरा करण्याची पद्धत : देशभरात सर्वत्र साजरा केला जाणार्या ‘होळी’ या सणात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण उत्साहाने सहभागी होतात. होळीची रचना करण्याची तिला सजवण्याची पद्धतीही स्थानपरत्वे पालटत असल्याचे सध्या पाहायला मिळते.
अर्व्वाच्च उच्चारण करण्याचा अर्थ
होळी पेटवल्यानंतर अर्व्वाच्च भाषेत बोंब मारण्याची प्रथा सर्वत्र पाहायला मिळते. ही विकृती नसून त्यामागेही शास्त्र दडलेले आहे. मात्र, काही ठिकाणी याचा अतिरेक केला जाऊन परस्परांतील वैर चव्हाट्यावर आणण्यासाठीही बोंब मारली जाते.
होळी पारंपरिक धार्मिक प्रथेनुसारच साजरी करा!
सध्या काही संस्था, संघटना आणि काही मंडळी वृक्षतोडीचे कारण पुढे करून ‘कचर्याची होळी करा’, असा संदेश समाजाला देतात. कचरा नेहमीच जाळायलाच हवा. मात्र, त्यासाठी होळीचेच निमित्त कशाला हवे? तसेच नैसर्गिक संतुलनाला बाधा आणण्यासाठी वृक्षतोड ही घातकच कृती आहे. त्याबाबत दुमत नसावे. मात्र, त्याचबरोबर होळीव्यतिरिक्त अन्य वेळी केली जाणारी वृक्षतोडीबाबतही जागृतता असणे आवश्यक आहे. त्यामुळे मग अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करणार्या आणि कचरा जाळण्याची बुद्धी न होणार्या टीकाकारांबद्दल काय म्हणावे? तसेच अनेक गोष्टींसाठी वृक्षतोड केली जाते. तिकडेही दुर्लक्ष होता कामा नये.
गैरप्रकार रोखणे, हे धर्मकर्तव्य: सांप्रत होळीच्या निमित्ताने गैरप्रकार होतात, उदा. वाटमारी होते, दुसर्यांची झाडे तोडली जातात, मालमत्तेची चोरी होते, दारू पिऊन धिंगाणा घातला जातो तसेच रंगपंचमीच्या निमित्ताने एकमेकांना घाणेरड्या पाण्याचे फुगे फेकून मारणे, घातक रंग अंगाला फासणे आदी गैरप्रकार होतात. या गैरप्रकारांमुळे धर्महानी होते. ती रोखणे हे आपले धर्मकर्तव्यच आहे. यासाठी समाजाचेही प्रबोधन करा. प्रबोधन करूनही गैरप्रकार घडताना आढळल्यास पोलिसांत गार्हाणे करा. ‘सनातन संस्था’ यासंदर्भात जनजागृती चळवळ राबवते. आपल्या संस्कृतीतील चांगल्या गोष्टींचे अनुकरण केले पाहिजे आणि धर्म, संस्कृती, सण, उत्सव अशा गोष्टींचे महत्त्व आणि माहात्म्य मोठे असून जपायला हवे. होळीचा सणही असाच आहे. त्याचे माहात्म्य, पावित्र्य राखूनच तो साजरा करायला हवा.
फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा हा सण देशभरात उत्साहात साजरा केला जातो. देशपरत्वे सण साजरा करण्यामागील इतिहास आणि तो साजरा करण्याची पद्धत जरी भिन्न-भिन्न असली, तरी त्यामागील उद्देश मात्र सारखाच असतो. या सणाचे महत्त्व, तो साजरा करण्याची पद्धत, याविषयीची माहिती या लेखातून करून घेणार आहोत.
(संदर्भ : सनातन संस्थेचा ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’)