पिंपरी : ह्युंड्याई कंपनीच्यावतीने रहाटणीमधील कापसे लॉन्स येथे मेगा एक्सचेंज अँड प्रीलोन कार कार्निव्हलचे आयोजन करण्यात आले होते. गणेशोत्सवाच्या काळात स्वप्नातील कार कमी किंमतीत आपल्या जवळच्या ठिकाणावरून ग्राहकांना घेता यावी यासाठी ह्युंडाईने या कार्निवलचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे पिंपरी-चिंचवडवासियांना ही मोठी संधी उपलब्ध झाली होती. या कार्निवलमध्ये विविध प्रकारच्या कार उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. गणेशोत्सवानिमित्त नवीन कारच्या खरेदीवर 5 ग्रॅमचे सोन्याचे नाणे देण्यात आले. अशा अजुनही छान छान ऑफर देण्यात आल्या होत्या. आज या कार्निवलचा अखेरचा दिवस होता, त्यामुळे नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला