चाकण : गुरूवारी सकाळी अकराच्या सुमारास झेड एफ कंपनीमधील स्वप्नील माहुरकर यांची मोटार (एमएच14 इवाय 2128) एका पादचार्याला वाचविताना उलटली. खालुंब्रे गावच्या हद्दीत ह्यूंदाई कंपनी समोर खालुंब्रे-सावरदरी रस्त्यावर हा अपघात झाला. रस्ता ओलांडणारा पादचारी अचानक समोर आल्याने पुढीला टँकरला मोटार मागून धडकली. चालकाच्या बाजूने रस्त्यावर आडवी पडली. चालक माहुरकर मोटारीतच अडकले होते. परंतु प्रसंगावधान राखून वरच्या दिशेने खिडकीतून उडी मारून आपला जीव वाचवला.