ह.प्र.म. पंतसंस्थेच्या अध्यक्षांची निवड

0

शेंदुर्णी। येथील पुज्य हरीप्रसाद महाराज महाविद्यालयीन कर्मचार्‍यांची सहकारी पतसंस्था मर्यादित शेंदुर्णीची सर्वसाधारण सभा सोमवार 24 जुलै रोजी सकाळी 11.30 वाजता महाविद्यालयात पार पडली. यात अध्यक्ष व सचिव यांना कार्यकाळ संपल्यामुळे नविन अध्यक्ष व सचिव यांनी निवड करण्यात आली. यात पतसंस्थेचे जेष्ठ संचालक प्रा. एस.जी.डेहरकर यांची अध्यक्षपदी तर प्रा. सुजता पाटील यांची सचिवपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

उपस्थितांनी केले अभिनंदन
यावेळी सभेत पुज्य ह.प्र.म.पतसंस्थेचे संचालक व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या निवडीबद्दल संस्थेचे चेअरमन संजय गरूड, सचिव दिपक गरूड, प्राचार्य डॉ. वासुदेव पाटील, उपप्राचार्य एन.एस.सावळे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उप्राचार्य आर.जी.पाटील, डॉ.साळुंखे, प्रा.डॉ. भोळे, प्रा.योगिता चौधरी, एस.के.बाविस्कर, मुख्यलिपीक हितेंद्र गरूड, प्रा.जिवरग, प्रा.दिनेश पाटील, प्रा.पतंगे, प्रा. महाजन, प्रा. सोनवणे, प्रा.जावळे, प्रा.गव्हारे, प्रा.भूषण पाटील, सरला तडवी यांनी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.