घरात कुणीही नसतांना केर्‍हाळा येथे 38 हजारांचा ऐवज चोरीला

0

रावेर- घरात कोणीही नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने 38 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लांबविल्याची घटना तालुक्यातील केर्‍हाळा येथे घडली आहे.पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की सायराबी शेख अकबर या 25 रोजी घराला कुलुप लावून बाहेर गावी गेल्या होत्या दुसर्‍या दिवशी 26 रोजी त्या घरी आल्या असता चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. अज्ञात चोरटे घराचा कडी कोंडा तोडून घरात प्रवेश केला व 15 ग्रॅम वजनाचे सोन्याची वीस हजार रुपये किमतीची पदक असलेली पोत 4 ग्रॅम वजनाचे तीन हजार रुपये किमतीचे तरण फुले तर 15 हजार रुपये रोख असा एकूण 38 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लांबवला आहे. याबाबत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हेकॉ विजू जावरे करीत आहेत.