निवडणूक आचारसंहिता फेब्रुवारी महिन्यात घोषित होण्याची शक्यता?
नवी दिल्ली: २०१४ पासून चार वर्षात केलेल्या कामाचा हिशोब पंतप्रधान नरेंद्र मोदी देणार आहेत. पंतप्रधानांच्या कार्यालयाने भारतातील चार वर्षात झालेल्या कामांचा आढावा घेतला आहे. सर्व राज्यांकडून पूर्ण झालेल्या प्रकल्पांची किंवा पुढील काही महिन्यांत पूर्ण होणार आहेत याची माहिती मागविली होती. माध्यमांच्या वृत्तानुसार या प्रकल्पांचे उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: करणार असून केंद्र सरकारचे चार वर्षांतील विकास काम म्हणून याचा प्रचार करण्यात येणार आहे. किमान १० लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रात पंतप्रधान मोदी एका प्रकल्पाचे उद्धाटन करतील.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड, गुजरात आणि महाराष्ट्र हे राज्यांना केंद्राने प्राधान्य दिले आहे. यामद्ये रस्ते व परिवाहनमंत्री नितीन गडकरी यांच्या अखत्यारीत असणाऱ्या रस्ते आणि परिवहन विभागाने सर्वाधिक प्रकल्प पूर्ण केले आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदी पुढील तीन महिन्यात देशातील विविध भागात रस्ते प्रकल्पांचे उद्धाटन करण्याची शक्यता आहे.
फेब्रुवारी महिन्यात निवडणूक आचारसंहिता घोषित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकासाठी मोदी सरकारने मास्टरप्लॅन तयार केला आहे. आतापर्यंत केलेल्या सर्व प्रकल्पांच्या उद्धाटन करण्याचा धडकाच लावणार आहेत. राज्यातील २५ प्रकल्पांचे १०० दिवसांमध्ये उद्धघाटन केले जाणर आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला केलेल्या कामांची माहिती देतील. जानेवारी महिन्यापर्यंत देशभरात ५० सभा करण्याचा निर्णय घेतला आहे.