नवी दिल्ली : कोरोनामुळे आर्थिक संकट ओढवले आहे. अनेक उद्योगांना याचा फटका बसला आहे. त्यामुळे साहजिकच रोजगारावर परिणाम झाले आहे. आर्थिक परिस्थिती गंभीर असताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी उपाययोजन केल्या जात आहे. कोरोनामुळे100 वर्षांतील सर्वात वाईट आरोग्य आणि आर्थिक संकट आहे, या संकटातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले आहे. शक्तिकांत दास यांनी आज सातव्या एसबीआय बँकिग अँड इकॉनॉमिक्स कॉन्क्लेव्हला संबोधित केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा हा कार्यक्रम व्हर्चुअल झाला. या कार्यक्रमात अनेक अर्थतज्ञांनी सहभाग घेतला आहे. दोन दिवस हा कार्यक्रम सुरु राहणार आहे. या कॉन्क्लेव्हची थीम ‘बिझनेस आणि अर्थव्यवस्थेवर कोरोनाचा प्रभाव’ अशी आहे.
फेब्रुवारी 2019 पासून आतापर्यंत आरबीआयने 115 बेसिस पॉईंट्सची कपात केली आहे. वृद्धी दरात झालेल्या घरणीतून सावरण्यासाठी तशा प्रकारची पावले उचलण्यात आली आहेत. याबाबत मॉनिटरी पॉलिसी कमिटी रिझॉल्युशनमध्येही सांगण्यात आले आहे.