१० टक्के आरक्षण कोर्टात टिकेल का?; शरद पवारांचा प्रश्न

0

कोल्हापूर: आर्थिकदृष्ट्या मागास सवर्ण घटकाला शिक्षण व नोकरीत १० टक्के आरक्षण देण्याबाबत केंद्र सरकारने विधेयक पारित केले आहे. मात्र हे आरक्षण न्यायालयात टिकेल का? अशी शंका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित केली आहे. कोल्हापूर दौऱ्यावेळी माध्यमांशी पवार यांनी आरक्षणाबद्दल काही प्रश्न उपस्थित केले.

आरक्षणाने ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली आहे. ५० टक्क्यांपुढील आरक्षण टिकणार नाही, हे सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा स्पष्ट केले आहे. या आरक्षणासाठी घटना दुरुस्ती केल्याचे सरकारकडून सांगितले जात आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या आरक्षणाच्या ढाच्यात बदल करण्याचा अधिकार कोणालाही नाही, असे शरद पवार यांनी सांगितले आहे.