१० टक्के आरक्षण वोट-बँकेचे राजकारण करणाऱ्यांना चपराक-मोदी

0

सोलापूर-केंद्र सरकारने लोकसभेत सवर्ण जातीतील आर्थिकदृष्ट्या मागास घटकाला शिक्षण व नोकरीत १० टक्के आरक्षण देण्यासाठी विधेयक मंजूर केले आहे. आजपर्यंत वोट-बँकेचे राजकारण करणाऱ्यांनी दलित, आदिवासी, ओबीसींचे आरक्षण कमी करण्यात येत असल्याची खोटी माहिती पसरविली. मात्र कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता या सरकारने आरक्षण देण्याचे प्रयत्न केल्याने कालच्या लोकसभेतील निर्णयाने वोट-बँकेचे राजकारण करणाऱ्यांना चपराक बसली आहे असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना लगावला.

आज सोलापुरात ते बोलत आहे. ‘सबका साथ-सबका विकास’ या मंत्राला पूर्ण करण्याचे काम भाजप सरकारने केले आहे. आरक्षणाचा विधेयक लोकसभेत पास झाले आहे, राज्यसभेतही जनभावनेचा आदर करत विरोधकांनी या विधेयकाला पाठींबा द्यावा असे आवाहन मोदींनी केले.

१ हजार कोटींच्या रेल्वेमार्गाला मंजुरी
सोलापूर-उस्मानाबाद-तुळजापूर रेल्वेमार्गासाठी १ हजार कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे अशी घोषण मोदींनी केली आहे. ३० हजार कुटुंबीयांसाठी घर, रस्ते, पाणी-पुरवठा योजनेचा शुभारंभ मोदींच्या हस्ते करण्यात आले.