१० टन प्लास्टीक पिशव्या जप्त

0

सकाळी १०.३० पासून कारवाईस सुरुवात; प्लास्टिक विक्रेत्यांमध्ये खळबळ

जळगाव । येथील पोलन पेठ, शिवाजी रोड दाणा बाजार शिव प्लास्ट अ‍ॅण्ड पॅकेजिंग येथे १७६ किलो २० मॅक्रोयमच्या प्लास्टिक पिशव्या व चहाचे कप आरोग्य विभाग व अतिक्रमण विभागाच्या संयुक्त कारवाईत जप्त करण्यात आले होते. यासंदर्भांत दुकानदाराकडून दंड वसूल करण्यात आला होता. याबाबतची तक्रार शनी पेठ पोलीस स्टेशनला एच. एम. खान, दिनेश गोयार, एस. बी. बडगुजर यांनी केली होती. आज बुधवारी दुकानमालाक विनयकांत मोहन खानचंदानी यांनी पोलीसांना महापालिकेकडून करण्यात आलेली कारवाई चुकीची असल्याचे सांगितलेबाबत कळते. तसेच दुकानात ५० मॅक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या आढळल्यास दुकान बंद करणार असल्याचे सांगितले. दरम्यान आरोग्यनिरीक्षक आनंद सोनवाल व दिनेश गोयर यांनी शिव प्लास्टिक येथे पाहणी केली असता त्यांना पाचव्या मजल्यावर प्लास्टिक पिशव्या असल्याचे निदर्शनास आले. यामुळे त्यांनी तात्काळ आरोग्याधिकारी उदय पाटील यांना भ्रमणध्वनीद्वारे सर्व हकीकत सांगितल्यानंतर कर्मचार्‍यांसह श्री.पाटील हजर झाले.

शहरातील सर्वात मोठी कारवाई; २० हजारांचा दंड३७० बॅग्ज केल्या जप्त
आरोग्य निरीक्षक, आनंद सोनवाल व दिनेश गोयर या दोघांनी शिव प्लास्ट अ‍ॅण्ड पॅकेजिंग या होलसेल २० माइक्रॉकॉन प्लास्टिक पीशवी विकणार्‍या डिस्ट्रिब्युटरवर धाड टाकुन ५ मजल्यांवरील गोडाउनमध्ये ६ टन माल पकडला. याबाबत त्यांनी वरिष्ठ अधिकारी यांना माहिती दिली. माहिती मिळताच आरोग्य निरीक्षक उदय पाटील, एच. एम. खान, एस. टी. बडगुजर, अशोक नेमाडे, संजय धंडोरे, रमेश कांबळे, अत्तरदे, अतिष राणा यांच्या पथकाने दुकानाची तपासणी केली. या तपासणी दरम्यान दुकानाच्या पाचव्या मजल्यावर जवळपास २ ट्रक प्लास्टीक पिशव्या त्यांना आढळून आल्या आहेत. ही कारवाई सकाळी १०.३० वाजेपासून सुरू झाली होती ती सायंकाळपर्यंत चालली. याकारवाईत प्लास्टीक पिशव्यांच्या प्रत्येकी ३० किलो वजनाच्या ३७० बॅग्ज जप्त करण्यात आल्या आहेत. या बॅग्ज वजन जवळपास १० टन असून यातील ६ टन माल ५ टॅक्ट्रर महापालिकेच्या गोडावून मध्ये पाठविण्यात आले आहे.

महापालिका गोडाऊनमध्ये ठेवला जप्त केलेला माल
तसेच उर्वरीत माल सिल करण्यात आला आहे. दुकान मालक विनय मोहन खानचंदानी यास २० हजारांचा दंड करण्यात आला आहे. तसेच उर्वरीत कारवाई गुरूवारी करण्यात येणार आहे. महापालिकेकडून ऐवढ्या मोठ्या प्रमाणात प्लास्टीक जप्तीची कारवाई प्रथमच करण्यात आली आहे. या कारवाईमुळे प्लास्टीक पिशव्या विक्रेत्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून त्यांनी आपली दुकाने बंद केली आहेत. दरम्यान, हा माल जवळपास दिड लाख रूपयांचा असल्याचे सांगण्यात येत आहे.