ठेकेदाराने बुडविले ३५ ते ४० लाखांची रक्कम
जळगाव: जिल्ह्यातील शालेय पोषण आहार प्रकरण नेहमीच राज्यात चर्चेत राहिलेले आहे. प्रत्येकवेळी नवनवीन घोळ समोर येत असतो. आता ठेकेदाराने पोषण आहाराच्या खाली गोण्याचा लीलाव करून ती रक्कम संचालनालयाकडे जमा केल्याचा नवीन घोळ समोर आला आहे. करारनाम्यात धान्य पुरवठा केल्यानंतर रिकाम्या गोण्यांचे लिलाव करून ती रक्कम संचालनालयाकडे जमा करण्याचे नमूद आहे. मात्र गेल्या १० महिन्यात एकही गोण्यांचा लिलाव करण्यात आलेले नसून ३५ ते ४० लाखांची रक्कम बुडविल्याचे समोर आले आहे. फेब्रुवारीपासून गोण्या जमा करण्यात आल्या नाही व लिलाव ही झाला नसल्याने ३५ ते ४० लाखाचे नुकसान झाले आहे.
ठेकेदाराकडून करारनाम्याचे उल्लंघन
जिल्ह्यामध्ये मालाचा पुरवठा वाहतूक करून शाळा स्तरापर्यंत पोहोचण्याकरता शासनाचा व गुनिना कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामध्ये १४ फेब्रुवारी २०१९ मध्ये रोजी करारनामा झालेला आहे.या करारनाम्याच्या अटी शर्ती मध्ये मुद्दा क्रमांक ४६ मध्ये पुरवठादाराने तांदूळ धान्यादी मालाचा पुरवठा करताना पूर्वीच्या पुरवठ्यातील रिकाम्या झालेल्या तांदुळाच्या गोळ्यांची प्रत्येक शाळेमधून उचल करून त्याप्रमाणे नोंद ठेवणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.तसेच उचल केलेल्या गोण्यांची विगतवारी करून त्याची पारदर्शक पद्धतीने लिलावाद्वारे विक्री करावी असे म्हटले आहे.मात्र आज पर्यंत गोण्या जमा करण्यात आल्या नाही. आजपर्यंत शाळास्तरावरून रिकाम्या गोण्या जमा करून लिलाव झाला नाही.आता या गोण्या किती शिल्लक असतील याबाबत मोठी शंका निर्माण होत आहे. शिक्षण विभागाच्या गलथान कारभारामुळे शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे.या प्रक्रियेला विलंब का झाला याची चौकशी होणे गरजेचे होते. परंतु असे न होता मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी देखील सदर पत्र निर्गमित केले आहे.आता शाळेतुन किती गोण्या जमा होतात हे पहाणे औसुक्याचे ठरेल.