११ डिसेंबरनंतर राजस्थानमध्ये बनणार कॉंग्रेस सरकार-सचिन पायलट

0

जयपुर। राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी ८ वाजेपासून मतदान सुरु आहे. सामान्य जनतेसोबतच राजकीय नेते रांगेत उभे राहून मतदान करत आहे. राजस्थान प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन पायलट यांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. यावेळी त्यांनी ११ डिसेंबरनंतर राजस्थानमध्ये कॉंग्रेस सरकार निश्चित बनणार आहे असा दावा केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील राजस्थानमध्ये भाजपचा पराभव दिसून येत होता. त्यामुळेच ते शेवटपर्यंत प्रचार करत होते असे आरोप सचिन पायलट यांनी केले आहे.