११ दिवस श्रीराम कथा महाेत्सव

0

जळगाव : श्री सिद्धी व्यंकटेश देवस्थानतर्फे कार्तिक मासात १५ ते २५ नोव्हेंबरदरम्यान श्रीराम कथा महाेत्सवाचे अायाेजन करण्यात अाले अाहे. सागरपार्क येथे ११ दिवस चालणाऱ्या या कथा महाेत्सवात श्री अतुलकृष्ण भारद्वाज महाराज हे दाेन सत्रात रामायण कथा सांगणार अाहेत.

या कथा एेकायला येणाऱ्या भाविकांना बसण्यासाठी सुमारे एक लाख फुटाचा डाेम मंडप उभारण्यात येणार अाहे. मंडप १३० बाय ३०० फुटांचा असेल. त्यात ३० बाय ५० फुटांचे व्यासपीठ राहील. मंडपात एकही खांब नसल्याने भाविकांना कथेचा अास्वाद विना अडथळा घेता येणार अाहे. शहरात हाेणाऱ्या विविध कथा महाेत्सवात गेल्या दहा वर्षांपासून एकच सत्रात कथा सांगितली जाते. या महाेत्सवाचे वैशिष्ट्ये म्हणजे यात सकाळी ९ ते दुपारी १२ व दुपारी ३ ते संध्याकाळी ६ या दाेन सत्रात हाेणार अाहे.

या कथेदरम्यान धार्मिक वस्तू व पुस्तकांचे २५० स्टाॅल उभारण्यात येणार अाहेत. कथेला येण्यासाठी अाजूबाजूच्या गावांतून एस.टी.ची तसेच कथेच्या ठिकाणी वाहनांच्या पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार असल्याचे देवस्थानतर्फे पत्रकाद्वारे कळवण्यात अाले अाहे