११ लाख पॅनकार्ड रद्द

0

नवी दिल्ली: केंद्र सरकारने ११ लाख ४४ हजार पॅन कार्ड रद्द केल्याची माहिती अर्थ राज्यमंत्री संतोष कुमार गंगवार यांनी संसदेत दिली आहे. एकाहून जास्त पॅनकार्ड बाळगणाऱ्या व्यक्तींचीच पॅनकार्ड रद्द केल्याचे त्यांनी सांगितले आहे. २७ जुलै पर्यंत काढलेली पॅनकार्ड तपासण्यात आली आहेत. त्यात १५६६ पॅनकार्ड बोगस असल्याचेही लक्षात आले आहे.

कसं पाहायचं आपल पॅन 
आधी इनकम टॅक्सच्या साईटवर जा. तेथे नो यूवर पॅन विकल्पाला क्लिक करा. एक नवी विंडो ओपन होईल. त्यात एक फॉर्म असेल त्यात पहिलं, मधलं आणि आडनाव टाका. लक्षात ठेवा नाव पॅन कार्डवरील नावासारखचं हवं. पॅनकार्डवरील जन्मतारीख फॉर्मवर टाका. मोबाईलवर एक कोड यईल तो टाका आणि फॉर्म सबमिट करा.