१२वीनंतर व्यवस्थापनशास्र शिक्षणातील संधी

0

सध्या कोरानाच्या आलेल्या संकटात संपूर्ण मनुष्य समाज घरात बंदिस्त झालेला आहे. आता सुरू असलेल्या आणि भविष्यात करावयाच्या सर्वच कामांबाबत माणसाच्या मनात कमालीची साशंकता निर्माण झालेली आहे. पण माणसाची सहनशक्ती, समजंसता, शिक्षण आणि कौशल्य माणसाला या संकटातूनही सहीसलामत बाहेर काढेल याबाबत शंकानाही. संकट येईल आणि निघूनही जाईल पण त्यासाठी आपल्या आयुष्याची गती मात्र थांबता कामा नये. या संकटातही आपण नवनविन संधीचा शोध आपल्याला घेता आला पाहिजे आणि भविष्यातील काही संधी हस्तगत करण्यासाठी आजच आवश्यक ते शिक्षण आणि कौशल्य शिकण्याची तयारी आपण सुरू केली पाहिजे.

कोरोनाच्या या संकटाने मानवाच्या भविष्यातील मानवी जीवन हे काहीसे बदललेले असेल. मानवीजीवन, उद्योेग, व्यवसाय यात योग्य अश्या व्यवस्थापनाला अनन्यसाधारण महत्व आलेले असेल. जागतिक उद्योेग आणि व्यापाराची दिशा पूर्णपणे बदणार आहे. भारतासारख्या विकसनशील देशाकडेजग नविन आशने आताच पाहू लागलेले आहे. अमेरिकेसारख्या बलाढय देशाला कोरोनावरील औषधांची भारताकडे मागणी करावी लागली. अमेरिका, जापान, ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्स सारखे काही देश आता चीनकडे संशयाने पाहू लागले आहेत आणि आपले उद्योेगधंदे चीनमधून हलवण्याची तयारीही करू लागले आहेत. मोठया प्रमाणावर उपलब्ध असलेल्या मनुष्यबळामूळे हे उद्योेगधंदे भविष्यात नक्कीच भारताकडे आकर्षित होतील. पण या सर्व उद्योेग व्यवसायांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच त्यांचे योग्य ते व्यवस्थापन करण्यासाठी उपलब्ध मनुष्यबळाकडे योग्य ते शिक्षण आणि कौशल्य असणे हेकाळाची गरज असेल. म्हणूनच नजीकच्या भविष्यात व्यवस्थापन क्षेत्रात रोजगाराच्या नवनविन संधी मोठया प्रमाणावर निर्माण होण्याची पूर्ण शक्यता आहे.

म्हणूनच येणार्‍या पिढीने पारंपारीक शिक्षणापेक्षा व्यवस्थापनशास्त्र शाखेतील योग्य ते शिक्षण आणि कौशल्य हस्तगत करण्याची योग्य वेळ आता चालून आलेली आहे. खासकरून १२ वी पास होउ घातलेल्या विदयाथ्यांनी आता व्यवस्थापन शास्त्रशिक्षणाची गरज आणि संधी यावर विचार करण्याची ही योग्य वेळ आहे. खान्देशतील विदयाथ्यार्र्ंना मुबई किंवा पुणे यांसारख्या शहरात मिळणारे आधूनिक व्यवस्थापन शास्त्रशिक्षण तेथील महागड्या फि मुळे किंवा अनावश्यक राहण्याखाण्याचा खर्चामुळे परवडतनाही. म्हणूनच अत्यंत चांगल्या क्षेत्रातील रोजगाराच्या संधी इच्छा असूनही केवळ योग्य ती पदवी नसल्यामूळे आपल्याला मिळत नाहीत. म्हणूनच आता आपल्या भागात आणि आपल्या आर्थिक कुवतीत व्यवस्थापन शास्त्रशिक्षण देणार्‍या शिक्षण संस्थांचा शोध आपण घेतला पाहिजे.

का घेतली पाहिजे व्यवस्थापनशास्त्रशाखेची व्यावसायिक अभ्यासक्रमातील पदवी –

१. मॅनेजर स्तरावरील नोकरीसाठी व्यवस्थापनशास्त्रातील सर्वोच्च पदवी एमबीए अत्यावश्यक असतेआणि एमबीए अभ्यास सोपा जावा यासाठी सर्व पायाभूत ज्ञानाची तयारी हया पदवी शिक्षणातच होत असते
२. पारंपारीक पदवी शिक्षण काहीसे सोपे असल्यामुळे पदवी सहज मिळते पण विदयाथ्यार्र्ंना कौशल्यविकासाच्या संधी जास्त मिळत नाहीत
३. १२वी नंतर या पदवी शिक्षणा सोबतच सी.ए. आणि सी.एस. सारख्या व्यावसायिकअभ्यासक्रमांचीही तयारी विद्यार्थी करू शकतो. बीबीए, बीएमस आणि इंटेग्रेटेड एमबीए चाअभ्यासक्रम त्यासाठी पुरक असतो
४. भविष्यात उद्योगजगताला कुशल मनुष्यबळाची मोठया प्रमाणावर आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे अश्या व्यावसायिकशिक्षणातून विदयाथ्यार्र्ंना रोजगाराच्या असंख्य संधी मिळतील
५. उद्योगविश्वालातसेच बँकिंग, ई कामर्स सारख्या क्षेत्रासाठी आवष्यक अश्या अकौंटंसी, टॅली, इआरपी, टॅक्सेशन, जीएसटी, सॉफटस्किलस्, फॅारेन लँग्वेज, संगणक ज्ञान, समर इंटर्नषीप प्रोग्राममुळे कंपनीत प्रत्यक्ष कामाचा येणारा अनुभव इ. सर्व गुणांची तयारी हया पदवी शिक्षणातच पूर्ण होते
६. विदयाथ्यार्र्ंसाठी सर्वात महत्वाचे म्हणजे पदवी नंतरच्या रोजगाराच्या संधी, त्या ट्रेनिंग अ‍ॅण्डप्लेसमेट डिपार्टमेंटच्या उदयोगजगताषी असलेल्या संबंधंमुळे लगेच मिळतात.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यायापीठामध्ये केसीई सोसायटीचे इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्च, जळगाव अर्थात आय.एम.आर. नावाने प्रसिद्ध असलेली संस्था ही खानदेशातील व्यवस्थापन शास्त्रशिक्षण देणारी पहिली संस्था आधुनिक व्यवस्थापन शास्त्रशिक्षण देण्यासाठी नेहमीच सज्ज आहे. १२वी पास होणार्‍या विद्यार्ध्यांसाठी संस्थेने बी.बी.ए. आणि बी.एम.एस. या व्यवस्थापनशास्त्र पदवीशिक्षणा सोबतच इंटिग्रेटेड एमबीए हा नवीन अभ्यासक्रम सुरू केलेला आहे जो उत्तर महाराष्ट्र विदयापीठात फक्त आयएमआर या संस्थेतच शिकवला जातो.

– प्रा.डॉ.शिल्पा बेंडाळे (संचालक, के.सी.ई.सोसायटीचे आय.एम.आर.)/ प्रा.यागेश पाटील (व्यवस्थापनशास्त्र विभाग)