१२०० विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप

0

देहुरोड- लायन्स क्लब एज्युकेशन असोसिएशनच्यावतीने त्यांच्या स्वनिधीतून क्लबच्या शाळेतील सुमारे 1200 विद्यार्थ्यांना शालेय पाठ्य-पुस्तकांचे व वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले. लायन्स क्लब असोसिएशनच्यावतीने प्रतिवर्षी शालेय पुस्तके व वह्या वाटपाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. यावर्षी सुमारे 1200 विद्यार्थ्यांना विजयकुमार आगरवाल व बोर्ड सदस्य रघुवीर शेलार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. याप्रसंगी अ‍ॅड. एल. एम. कौशल, अवतारसिंग कांद्रा, नरेंद्र महाजनी, नरेंद्र डोईफोडे, अशोक खैरे, महावीर बरलोटा, सुशीला नरवाल, श्रीरंग सावंत, गुरमेलसिंग राजू, आर. के. शर्मा, ह.भ.प. नामदेव भेगडे, शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. या उपक्रमाच्या माध्यमातुन बुक बँक तयार करण्यात आली आहे. त्यामुळे सुस्थितीत असलेली पुस्तके वरच्या वर्गात गेलेल्या विद्यार्थ्यांना वापरता येतील असे विश्‍वस्त नरेंद्र महाजनी यांनी सांगितले.