पिंपरी-चिंचवड :-थेरगाव येथे चिंचवड विधानसभा संजय गांधी योजना समितीच्यावतीने १२५ लाभार्थींना पेन्शन मंजुरीचे पत्र वाटप करण्यात आले. यामध्ये २ अंध, २० अपंग, ५ घटस्फोटीत महिला, ४ मूकबधिर, १९ ज्येष्ठ नागरिक, ७५ विधवा महिला यांना पेन्शन मंजुरीचे पत्र देण्यात आले.या कार्यक्रमाला आमदार लक्ष्मण जगताप, स्विकृत सदस्य गोपाळ मळेकर यांच्या हस्ते देण्यात आले.
कार्यक्रमाला यांची होती उपस्थिती
यावेळी नगरसेवक बाबा त्रिभुवन, अभिषेक बारणे, मनीषा पवार, संदीप गाडेस सामाजिक कार्यकर्ते नरेश खुळे, विजया देशमुख, रेखा माने, चंद्रकांत तापकीर, अमोल शिंदे, दिपक जाधव, प्रकाश देशमुख, संतोष जगताप, संभाजी बारणे, व्यकंटेश वाघमारे, संजय भोसले, एकनाथ मंजाळ, डॉ. दत्तात्रय देशमुख, रणजित घुमरे, समितीचे सदस्य नरेंद्र माने, बिभिषण चौधरी, दिलीप गडधे, अश्विनी तापकीर, आदिती निकम, चैत्राली शिंदे आदी उपस्थित होते.
चिंचवड विधानसभा मतदार संघातील थेरगाव, वाकड, ताथवडे, पुनावळे या गावांना मुळशी तालुका असल्यामुळे या गावातील प्रकरणे मुळशी तहसीलमध्ये मंजूर करण्यात आली. कार्यक्रमाचे बाळासाहेब साळुंके यांनी सूत्रसंचालन केले.