१३० कलाकारांनी ‘टू’ चित्रपटासाठी दिली ऑडीशन

0

जळगाव शहरातच होणार चित्रिकरण; अनेक जिल्ह्यांचा होता सहभाग

जळगाव । ‘क्षण’ प्रॉडक्शन प्रस्तुत ’टु’ (हात सुटला, साथ नाही) या विषयावरील खास युवकांच्या जीवनावरील आधारीत चित्रपटाचे ऑडिशन शहरातील मू.जे महाविद्यालयात पार पडले असून सोमवार ११ रोजी ऑडीशनसाठी शेवटची मुदत होती. यावेळी १४५ कलाकारांनी नोंदणी केली होती त्यापैकी १३० कलाकारांनी प्रत्यक्ष ऑडीशन दिली. यात १२ ते ६० वयोगटातील कलाकारांनी सहभाग घेतला.

यांनी नोंदविला सहभाग
नियोजित चित्रपटाच्या ऑडिशनसाठी धुळे, अमळनेर, पारोळा, रावेर, बोदवड, मलकापूर, नागपूर, चंद्रपूर, नाशिक, ठाणे, जामनेर व जळगाव शहरातील कलाकारांनी सहभाग नोंदविला. जळगावातीलच कलाकारांचा समावेश असणार्‍या या चित्रपटाचे चित्रीकरण शहरातच होणार असल्याने ऑडिशन देखील शहरातच घेण्यात आले. ऑडीशन उद्घाटन प्रसंगी मिलींद जैन यांनी हजेरी लावली. चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन भारत वाळके यांनी केले आहे. या चित्रपटाचे मनोज पाटील व निलेश चव्हाण हे निर्माते आहेत.