१५० महिलांना शाडू मातीपासून मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण

0

पिंपरी-चिंचवड- गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गणपतीच्या मूर्तींची मागणी होत आहे. दरम्यान पर्यावर पूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर दिला जात असून निगडी प्राधिकरण वाहतूकनगरी (मनपा आरोग्य कार्यालय / इसिए पर्यावरण संस्कार केंद्र) येथे गुरुवारी १६ रोजी शाडू मातीची मूर्ती बनविण्याचे १५० महिलांना मोफत प्रशिक्षण देण्यात आले.

हे उपक्रम इसिए, जळगाव जिल्हा लेवा समाज मंडळ, लेवाशक्ती सखी मंच, गगनगिरी विश्व फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आले. हा विशेष उपक्रम फक्त महिलांसाठी (गृहिणी) राबविण्यात आला. महिलांसाठी सुरु केलेल्या विशेष प्रशिक्षणाची माहिती व आवश्यकता इसिए अध्यक्ष विकास पाटील यांनी समजावून सांगितली.

कार्यशाळेस विशेष अथिती अनंत मेहेर, पर्यावरण तज्ञ इसिए अध्यक्ष विकास पाटील, कार्यकारी अधिकारी स्नेहल पवार, दैनिक जनशक्तीचे व्यवस्थापक किरण चौधरी, बाबुराव फडतरे, मूर्ती प्रशिक्षक विश्वास फडणीस, रेखा भोळे, गौरी सरोदे, विभावरी इंगळे, विजया जंगले, संगीता कवडे, स्मिता दुसाने, अनिता सोनावणे, योगिता बर्हाटे, सुभाष चव्हाण आदींसह ६७ महिलांची उपस्थिती लाभली.

पिंपरी चिंचवड शहरातील १२०० शिक्षकांना प्रशिक्षण दिल्यानंतर इसिएने महाविद्यालयांकडे मोर्चा वळविला होता. आता इसिएने महिलांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन केले आहे. गगनगिरी विश्व फाउंडेशनच्या रेखा भोळे यांनी नदी प्रदूषण टाळण्यासाठी गणेशोत्सवात अधिकाधिक शाडू मातीच्या मुर्त्या खरेदी करण्याचे आवाहन केले. सहभागी प्रशिक्षणार्थीना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. दरम्यान इसिए, जळगाव जिल्हा लेवा समाज मंडळ, लेवाशक्ती सखी मंच, गगनगिरी विश्व फाउंडेशन आदींतर्फे महिलांचे स्वागत करण्यात आले तसेच त्यांना प्रशिक्षणासाठी सर्वोतोपरी मदत देखील करण्यात आली.