१५ नोव्हेंबरला बैठक, त्यात सगळे निर्णय घेऊ: नितीश कुमारांची घोषणा

0

पटना: बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाले आहे. पुन्हा नितीश कुमार मुख्यमंत्री होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. एनडीएने २४३ पैकी १२५ जागा मिळवून बहुमत राखले आहे. मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीकडे लक्ष लागले आहे. आज शुक्रवारी १३ रोजी एनडीएची बैठक झाली, यानंतर पत्रकार परिषद घेऊन नितीश कुमार यांनी निर्णय जाहीर केला. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर नितीश कुमार प्रथमच माध्यमांसमोर आले. १५ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता एनडीएची बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत पुढील निर्णय घेणार असल्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जाहीर केले.