१५ वर्ष जुनी वाहने रस्त्यावर दिसल्यास जप्त करा-कोर्ट

0

नवी दिल्ली-दिल्लीत सध्या प्रदूषणाची समस्या गंभीर बनली आहे. त्याची दखल घेत सुप्रीम कोर्टाने राजधानी दिल्लीसह देशातील इतर राजधानीच्या शहरात १५ वर्ष जुन्या पेट्रोल वाहने व १० वर्ष जुन्या डीझेल वाहनावर बंदी घातली आहे. जर ही वाहने रस्त्यावर दिसली तर त्या जप्त करा अशा सूचना सुप्रीम कोर्टाने दिल्या.

सुप्रीम कोर्टाने जुने वाहन बंद करण्याबाबतचे एनजीटीचा २०१५ चा आदेश लागू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दिल्लीत परिवहन विभागातर्फे आतापर्यंत १५ वर्ष जुन्या २ लाखाहून अधिक वाहनांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. काही वाहनांची नोंदणी रद्द करण्याचे काम सुरु आहे लवकरच जुन्या वाहनांची नोंदणी रद्द केली जाईल. तसेच १५ वर्ष जुन्या १६५ गाड्या देखील जप्त केल्या आहेत. दिल्लीत प्रदूषणाची समस्या अतिशय गंभीर बनली आहे. त्यामुळेच ही कार्यवाही केली जात आहे.