बंगळूर-कर्नाटकातील मागास भागात ‘जननी अम्मा’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुलागिट्टी नरसम्मा यांचे वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झाले. कोणत्याही वैद्यकीय मदतीशिवाय सुखरूप बाळंतपण करण्यासाठी त्या प्रसिद्ध होत्या. सुलागिट्टी नरसम्मा यांनी तब्बल पंधरा हजार महिलांचे बाळंतपण केले आहे. कर्नाटकमधील तुमकूर जिल्ह्यात सुलागिट्टी नरसम्मा यांचा जन्म झाला होता.
सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांचा २०१८ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. तुमकूर विद्यापीठाने डॉक्टरेट ही मानद पदवी दिली होती. याचबरोबर अनेक संस्थांच्या वतीने त्यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला होता.
ಪದ್ಮಶ್ರೀ ಪುರಸ್ಕೃತ ಸೂಲಗಿತ್ತಿ ನರಸಮ್ಮ ನಿಧನ ಅತೀವ ನೋವನ್ನುಂಟು ಮಾಡಿದೆ. ವೈದ್ಯರಿಲ್ಲದ ಕಾಲದಲ್ಲಿ 15ಸಾವಿರಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಹೆರಿಗೆ ಮಾಡಿಸಿದ ಮಹಾತಾಯಿಯಾಗಿದ್ದರು ಸೂಲಗಿತ್ತಿ ನರಸಮ್ಮ.
ಅವರ ಅಗಲಿಕೆ ಸಮಾಜಕ್ಕೆ ನಷ್ಟ, ಅವರ ಆತ್ಮಕ್ಕೆ ಶಾಂತಿ ಸಿಗಲಿ,ದೇವರು ಅವರ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ಅಗಲಿಕೆಯ ದುಃಖ ಭರಿಸುವ ಶಕ್ತಿ ನೀಡಲಿ ಎಂದು ಪ್ರಾರ್ಥಿಸುತ್ತೇನೆ pic.twitter.com/xHmycmYccF— H D Kumaraswamy (@hd_kumaraswamy) December 25, 2018
सुलागिट्टी नरसम्मा यांच्या निधनानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.