मुंबई : बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान आणि बॉलीवूडचा भाईजान सलमान खान यांची जोडी ‘हम तुम्हारे है सनम’ चित्रपटातून एकत्र झळकली होती. या जोडीला पुन्हा एकत्र पाहण्याची अनेकांची इच्छा होती. आता १६ वर्षांने ही जोडी भन्साळी यांच्या आगामी चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
चित्रपटाची कथा ही दोन मित्रांच्या मैत्रीवर आधारित असणार जे कालांतराने एकमेकांचे वैरी होतात. ‘पद्मावत’ला मिळालेल्या यशानंतर आता भन्साळींने या चित्रपटावर काम करण्यास सुरुवात केली आहे.