१८८चे उल्लंघन: राज्यात २ लाख गुन्हे दाखल

0

मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. याकाळात संचारबंदी देखील लागू करण्यात आलेली होती. संचारबंदीचे उल्लंघन आणि लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहे. राज्यात आत्तापर्यंत तब्बल २ लाख १९ हजार ९७५ गुन्हांची नोंद कलम १८८ चे उल्लंघन केल्याप्रकरणी नोंदविण्यात आले आहे. एएनआयने ही माहिती दिली आहे. २२ मार्चपासून तर आत्तापर्यंत हे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या नियमावलीचे पालन व्हावे यासाठी पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतलेली होती. मात्र नियमावलीचे अनेक ठिकाणी उल्लंघन झाल्याचे दिसून आले. त्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे.

कोरोनाच्या काळात पोलिसांनी कोरोना योद्धांची भूमिका बजावली आहे. मात्र कोरोना योद्धाच कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. २ ऑगस्टपर्यंत राज्यातील ९ हजार ५६६ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. ७ हजार ५३४ बरे झाले आहेत. दुर्दैवीबाब म्हणजे राज्यात १०३ पोलिसांचा मृत्यू देखील झाला आहे. सध्या १९२९ पोलिसांवर उपचार सुरु आहे.