१८९ प्रवाशांना घेऊन इंडोनेशियाचे विमान समुद्रात कोसळले

0

जकार्ता : लायन एअरवेजचे बोईंग ७३७ प्रवासी, विमान समुद्रात कोसळल्याची घटना घडली आहे. हे विमान जकार्ताहून पानगाकाल पिनांनगला निघाले असताना ही दुर्घटना घडलीयामध्ये १८९ प्रवाशांचा समावेश असल्याचे इंडोनेशिया परिवहन मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले. जकार्तामधून या विमानाने उड्डाण घेतले होते. उड्डाणानंतर १३ मिनिटातच या विमानाचा संपर्क तुटल्याचे सांगण्यात आले आहे..

इंडोनेशियन प्रशासनाकडून विमानाला शोधण्याची मोहीम सुरू आहे. सोमवारी सकाळी ६ वाजून ३३ मिनिटांनी विमानाचा संपर्क तुटला. लायन एअरवेजचे प्रवक्ते डँनंग मंडेला प्रिहान्टो यांनी विमानाशी संपर्क तुटल्याचे सांगितले आहे. विमान कोठे कोसळले हे अद्याप निश्चित झाले नसल्याचे त्यांनी सांगितले.