सिंधुदुर्ग – तब्बल १ कोटी रकमेच्या चलनात बाद झालेल्या जुन्या ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा बाळगणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने शनिवारी रात्री सावंतवाडी बसस्थानक परिसरातून ताब्यात घेतले.
नोटबंदीमध्ये जुन्या पाचशे, हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या. नोटबंदी होऊन सुमारे दीड वर्ष लोटले तरी अद्यापही काहींनी या नोटा बाळगून ठेवल्याचे उघडकीस येत आहे. अशाच प्रकारे तीन युवक गोवा येथून बेळगावला जुन्या नोटा घेऊन जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सापळा रचून या युवकांना ताब्यात घेतले आहे.
दरम्यान पोलिसांनी त्यांची नावे जाहीर करण्यास नकार दिला आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक प्रल्हाद पाटील, पोलीस उपनिरीक्षक रविराज फडणवीस, सत्यजित पाटील, जयेश सरमळकर, शांताराम परब यांचा सहभाग होता.