उद्या उद्धव ठाकरे घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ !

0

मुंबई: आज देवेंद्र फडणवीस यांचे ८० तासाचे सरकार कोसळले. अजित पवार यांनी राजीनामा दिल्याने सरकार अल्पमतात आल्याच्या लक्षात आल्याने मुख्यमंत्री पदाचा देवेंद्र फडणवीस यांनी देखील राजीनामा दिला. आता नवीन सरकार महाविकास आघाडी स्थापन करणार आहे. या सरकारचा शपथविधी सोहळा उद्या गुरुवारी २८ रोजी डिसेंबर रोजी होणार आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नावावर एकमत झाले आहे. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे नेतृत्व करणार आहे.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपला पाठींबा दिल्याने मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन केले होते. मात्र अजित पवार यांनी पक्षाविरोधात जाऊन हे पाऊल उचलल्याने सांगत शरद पवारांनी अजित पवारांना एकटे पाडले. त्यानंतर संपूर्ण राज्यातील राजकारण ढवळून निघाले. अखेर आज सुप्रीम कोर्टाने उद्या तातडीने बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आज दुपारी अजित पवार यांनी राजीनामा दिल्याने सरकार कोसळणार हे जवळपास निश्चित झाले होते. त्यानंतर फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला.